Jun 29, 2015

Killa Movie Review in Marathi.

वादळी समुद्र ज्याच्या लाटा आपल्याला क्षणात आत आत ओढत नेतो.

साधा खळखळणारा समुद्र ज्यात तुमचे ध्यान लागते…

शांत असा समुद्र जो तुम्हाला विचार करायला लावतो, आयुष्याबद्दल, मृत्युबद्दल. माणसाचं जगणं हे या समुद्रासमोर किती नगण्य आहे ह्याची प्रचीती त्या समुद्रसमोर बसलो कि येते.

आणि पाउस, समुद्राच्या जोडीला, मुसळधार, अगदी छातीत धडकी बसेल असा पाउस.

मनाचा आणि हृदयाचा किल्ला जिंकणे किती सोपे किंवा किती कठीण असते हे मी काय सांगू तुम्हाला? आपल्या आपल्या किल्ल्याचे योद्धे हि आपणच आणि रक्षक हि आपणच.

अशा या असंख्य पैलू सांभाळणारा आणि अतिशय सुंदर कथा सांगणारा हा नवीन सिनेमा किल्ला.

चिन्मय काळे आणि त्याची आई पुण्याहून गुहागरला बदली होऊन येतात. चिन्मयला ते सगळ आधी नकोसं वाटतं. हळू हळू तो मित्र बनवतो. ते गाव, तिथला किल्ला, समुद्र त्याला जवळचं वाटायला लागतं. त्यात त्याची साथ देतात ते त्याचे नवे मित्र - बंड्या, ओंड्या, उम्या आणि युवराज. काय मैफिल जमवली आहे इथे या चौघांनी!

पण हे सगळं मी इथे काय सांगू?

अप्रतीम अशी कोकणची पार्श्वभूमी, तिथला हिरवागार परिसर, समुद्राचे वेगवेगळे अवतार… सगळं एकदम मनमोहक आहे. मराठी सिनेमा हा एक वेगळे उच्चासन गाठतो आहे. वळू , नटरंग, देउळ, काकस्पर्ष असे कित्येक सिनेमे गेल्या काही वर्षात आले. किल्ला या यादीत अगदी पुढे बसेल.

ह्या चित्रपटाचं दिग्दर्शन जितकं कौतुकास्पद आहे तितकच कौतुक ह्यातल्या कलाकारांचं आहे.
अमृता सुभाष ने साकारलेली चिन्मय ची आई अविस्मरणीय आहे. चिन्मय, त्याच्या एकट्या पडलेल्या मुलाची भूमिका सुंदर रंगवतो. आणि त्याचे मित्र - बंड्या, ओंड्या, उम्या आणि युवराज - चिन्मयच्या शब्दात "एकदम भारी!"

आणि हा सिनेमा हॉल मध्ये बघा. टी व्ही वर यायची वाट बघू नका.

किल्लाचे ट्रेलर




No comments:

Disclaimer

All the opinions expressed are of the author only. Any action taken by readers on the basis of this blog is entirely at the readers' risk and they are solely responsible for the same.
Powered By Blogger